Sunday, December 25, 2016

९० दिवसाचा इंटर्नशिप उपक्रमाने विद्यार्थीना मिळाले नवीन आत्मविश्वासाचे बळ


राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाल विभागाने पत्रकारितेच्या विद्यार्थांसाठी ३ महिन्याच्या अभिनव इंटर्नशिप  उपक्रमाला सुरूवात करून राज्यातील पत्रकारितेच्या विद्यार्थांना नवे आत्मविश्वासाचे बळ दिल आहे. या आंतरवासिता करित असताना   माहिती व जनसंपर्क महासंचालनाल एक कर्मचारी म्हणून काम करण्याची मनमोकळी संधीही विभागा कडुन देण्यात आली. त्याबद्दल  मी, मनापूर्वक सर्व आंतरवासियाच्या वतीने विभागच्या आभार मानतो.
                                                                                                                     मी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आंतरवासियाच्या जाहिरात वाचली आणि थेट मी गावातून सरळ मुंबई गाठली. माझा सारख्या एका ग्रामीण भागातील विद्यार्थीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागा कडून मिळालेल्या प्रतिसाद बघून मी, फार भाराऊन गेले होते. कारण माझा साठी मुंबई काही नवीनच कल्पना होती. मी या मायावी नगरी आणि मंत्रालय याबद्दल  फक्त टीव्ही आणि वृत्तपत्रात पाहले व वाचले होते.  ते पण मला प्रत्येक्षात  या ९० दिवसाच्या इंटर्नशिप  करते वेळी अनुभवता आले.  माझा इंटर्शिपच्या पहिला दिवसा पासून तर शेवटच्या दिवसापर्यत मला एक गोष्ट खूप मनाला भिडली ती म्हणजे महासंचालक सरांनी  आम्हाला म्हणले की तुम्ही  इंटर्शिप विद्यार्थी म्हणून नाही तर एक विभागच्या कर्मचारीच आहेस असे. त्यांचे हे उद्गार आज पण आम्हा विद्यार्थीच्या प्रतेक्श आत्मविश्वास वाढवत आहे. माझा या तीन महिन्याच्या इंटर्शिप  मध्ये मला  माहिती व जनसंपर्क या कार्यालया आंतरवासिता करते वेळी शासनाच्या बारकाईने प्रसिद्धीचे काम मला पाहता आले. सत्तच्या कामाच्या तान याविभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वर असतो.  कारण शासनाच्या प्रसिद्धी विभाग अनुकल प्रसिद्धी साठी प्रामाणिक हे सर्व कर्मचारी दुमतीने कार्य करत असता.  याची एक बारीक चूक म्हणजे ''शासनाची बारिक चुक " अशीच सर्व़त्र मानली जाते  . पण या विभातील सर्व पदाधिकारी बिनचूक ही कामे  करित  असतात.  माझा 3 महिन्याच्या आंतरवासिता करित असतानी मला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  माहिती व जनसंपर्क  संचालक आणि पदाधिकारी आम्हा विध्यार्थाना  लेख लिहण्यासाठी सत्त प्रोत्सान देण्याचे काम त्यांनी  केले. ऐवढेच नव्हे तर आमचे लेख चेक करूण त्यात दुरस्ती करण्याचे सूचना आणि नवनव्या कल्पना ही त्यांनी सुचवल्या.

                मित्रानो आज सांगताना ऐवढा आनंद होतो की,या विभागातील सर्वच अधिकारी यांनी जे तीन महिन्यात प्रेम दिले त्यानी आज मी नव्ह तर इंटर्नशिपच्या प्रत्येक विधार्थी भाराउुन गेले होते. कारण आम्हाला शाषनाच काम म्हणजे असे फक्त खुडच्या तोडने असेच गावी  ऐकले होते. पण आज हे प्रत्येक्षपणे  व व्यक्तीगत हे सर्व काम पाहल्या नंतर शासनाच्या कामाची वास्तविक परिस्थिती कडली. आज शासनाचे काम हे जवाबदारीचे आहे त्यासाठी त्यांना  प्रत्येक वेळी अलर्ट राहावे लागते.  हे तर या ९० दिवसाच्या इंटरशिप मध्ये कळलेच .  पण त्याच बरोबर मोठ्या अधिकारी बरोबर शासनाचे प्रसिद्धीचे काम करण्याचा उत्कृष्ट अनुभव आम्हाला लाभला. हा अनुभव आम्हाला आमच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच कामात येईल.पत्रकारितेतील विद्यार्थी शिक्षण पुर्ण करूण जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्यात कौशल्य नसल्यामुळे किवा अनूभव नसल्याने त्याना नौकरी मिळत नसते त्यावेळी विद्यार्थीना नौकरी साठी भटकती करावी लागते. पण राज्यसरकारच्या वतिने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात घेण्यात येणाऱ्या आंतरवासिता उपक्रमाने आमच्यसारख्या नवशिक्षित विद्यार्थीना एक व्यास पिठ मिळालेले आहे. आणि यातील घेतलेला अनुभवाने आम्हा  विद्यार्थाना  नोकरी मिळविण्यासाठी एक सजीवनीचे काम करित आहे. त्याच बरोबर आज तंत्रज्ञानाचे जग आहे त्यामुळे बदलत्या काळानुसार शासनाचे प्रसिद्धीचे  क्षेत्र पण खूप बदल घडून आलेला आहे . त्या साठी सुध्या महाराष्ट्र शासानाच्या वतीने मनुष्यबळ विकासासाठी कौशल्य विकासाच्या एक भागच म्हणून अश्या प्रकारच्या इंटर्नशिप  हा उपक्रम सुरु करण्यात आले आहे. यामुळे वि़द्यार्थीना  याच्या भविष्यात  नक्कीच फायदा होणार आहे. 

 

Wednesday, December 7, 2016

देशातील सैनीकांना राजकीय शस्त्र बनवून नका !



"हिंदीत एक म्हणन आहे "दुष्म को कभी कम मत समझो" तरी पण आज आंतकवादी संघटनांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या राष्ट्राला आपले राजकीय पुढारी राजकारणाच्या रीगनात एकामेकाच उकिर काढत लक्ष्यभेदी हल्याच गाजावाजा करीत आहे. स्वताची पाठ  थोपटवुन  घेत आहे पाहिजे तितके नाना प्रकारे बोलल्या जात आहे. जर अशीच परीस्थित राहील तर लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर भारतावर २४ जवान मारल्या गेले त्यापेक्षा ही मोठा स्पोर्ट होऊ शकतो. म्हणून लक्षभेदी हल्ल्या वर  सरकारने उगाच  आंनदउत्सव  व राजकारण  करण्यापेक्षा  सैनिकांना  सुरक्षेसाठी आणि देशाच्या  हितासाठी मंत्राची वर्गशाळा घेणे आवश्यक आहे. 
                                                                                                      देशात मोदी सरकार सत्ते आली तेव्हा पासून देशात राष्ट्रवादाने मोठा वनवा घेतला. पण सर्वघडत असतानाही सीमेवरील आणि कश्मीर मध्ये जो प्रकार घडला हे समजून घेणे गरजेचे आहे. बुरांन वाणीच्या खात्मा केल्या नंतर दहशतवाद्यांची करडी नजर सीमेनजीक कुरापतीचा कट रचण्याची होती. तेव्हा पासूनच सीमा क्षेत्राची सुरक्षा वाढवणे गरजेचे होते. पण सरकार ने काश्मीर घटनेला बारीक लक्ष नव्हतं असे म्हणावे लागेल  पठाण कोट, उरी आणि आता नारगोटा हमला पर्यंत पाहल तर कुठे तरी सुरक्षा  वेवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते. पण कोणी या संदर्भता विचार नाही केला त्यामुळे आज उरी आणि आणि नारगोटा हमले झाले. परिकिय साहेबानी सर्जिकल स्ट्राईक वर पाकिस्तान कोमात गेल्याची भाषा वापरणं योग्य नव्हतंच स्वता आत्मपरिक्ष करण्याची गरज होती. ती पण या नवीन सरकार मध्ये दिसत नाही. आज सिमेवरील सैनीकांना पूर्ण सुरक्षेच्या सुविधा पुरवणे गरजेचं आहे. कारण ज्याप्रकारे मोदी सरकार स्मार्ट सिटी, डिजीटल इंडियाचा गोष्टी करण्यापेक्षा देशा अंतर्गत शेतकऱ्याना आणि सीमेवरील सैनीकांना स्मार्ट बनविणें आवश्यक आहे. फक्त त्यांना मरणोत्तर वीर पुरस्कार जाहीर केल्याने चालणार नाही. तर त्यांना त्यांच्या कार्याविषयी स्मार्ट बनवावेच लागेल. मागील काळात महाराष्ट्रातील पुलागाव येथील सेनिकांच्या शस्त्र साठेत अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमानात हानी झाली होती. ते पण त्यात नेमकं कारण काय यांच्या सुध्या आज पर्यंत मागोवा लागला नाही.
                                                                                 सीमा सुरक्षा हा एक देशातील एक स्ववेदनशील विषय आहे. यावर उगळ चर्चा करणे चुकी चे आहे. पण सत्त्ते असलेल्या सरकारला याविषयी गंभीरता बाळगणे आवश्यक आहे.  भारताच्या लक्षभेदी हल्ल्या नंतर काँग्रेस आणि आम आदमी  याविरोधी पक्षा कडून मोदी सरकारवर जो हल्ला झाला आणि थेट लक्षभेदी हल्ल्याचे विरुद्ध  पुरावे मागण्यात आले. त्यावरून जे राजकारण झालं ते पाहण्यासारखेच  आहे. आपली सर्वप्रथम चूक म्हणजे लक्षभेदी हल्ल्या वरून प्रसार माध्यमावर एकमेका पक्षावर चिखल फेक करत येवढे मग्न झाले होते की, पाकिस्तानने पण प्रसार माध्यमातील लोकांना सिमेवर वर जाऊन भारता कडून लक्षभेदी हल्ला न झाल्याचं पष्टीकर देणे सुरु केले होते. पण या घटने अगोदर आपलं आत्मपरिक्ष केलं असत तर ते उत्तम झालं असत कारण लक्ष भेदी हल्ल्या नंतर भारताचे जे 24 जवान मारल्या गेले. त्यांना आज आपण वाचवू  शकलो असतो. त्याच प्रमाणे आज सरकार देशभक्ती आणि देश प्रेम या गोष्टीत  इतकी धुंद दिसते की आपल्या जवाबदारीच आणि वास्तविक परिस्थितीच भान नसल्याचं मनावे लागेल. उगाच सैनीकांच प्रश्नाच राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नका तर त्याच्या सुरक्षा सुविधा वाढवण्यावर आज लक्ष देणे त्यात भर घालणे सरकार ला आवश्यक आहे.
                                                                                                     आज केंद्र सरकार ने 7 वेतन आयोग लागू करण्यात आले आहे. पण त्याच्या फायदा मोठे अधिकारी यांनाच होताना दिसतं आहे. जे सीमेवर देशाची सुरक्षा करीत अहोरात्र उभे  आहे त्यांना मासिक वेतन 20 हजार रुपये त्यांत पण त्यांच्या टँक्स कपात केली जातात. म्हणून आज सैनीकांना आपल्या हक्का साठी  सरकारला विचारणा करण्याची आणि आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी देशातील सेनिकांच्या  आदर आणि सन्मान  देण्याचा गोष्ट आपल्या भाषणातून देशातील नागरिकांना सांगीत असतात पण सैनीकांचे आज काय प्रश्न आहे. यावर मोन बाळगणारी सरकार कधी चर्चा  सुद्धा करत  नाही असेच बोलावे लागेल. आपल्या देशात “आयएसआय” सारख्या  दशतवादी संघटना  देशातील शिक्षित तरुणा फुस लावण्याचा कट रचण्याचा प्रयत्न करीत असल्याच  घटना आपल्या कानावर येतच आहे. त्यामुळे  देशच्या सीमा सुरक्षा आणि देशा अंतर्गत सुरक्षा वाढने गरजेचं आहे. त्याच बरोबर देशाच्या जनतेची सुरक्षाची जवाबदारी देशातील सिमेवर सैनीकांची आहे तर त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी सरकारची आहे हे  भान विसुन चालणार नाही. त्यावर उगाच विरोधी पक्षा उत्तर देण्या पेक्षा आणि स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडिया घोषणाबाजी  करण्यापेक्षा  देशाच्या  सुरक्षा वेवस्था स्मार्ट  बनविणे आज  आवश्यक आहे.

नितीन बिनेकर  
मो.९९७०४२०७३६  
 

Tuesday, October 11, 2016

सोशल मिडीया समाज के लिए घातक

आज सोशल मिडीया पर जो लोग कॅमेन्ड करते है। ना उन्हे किसी का डर है ना किसी की फिकर है। पर उसका प्रभाव देश के जो युवा हे उनपर पडता है। जिस पर आज विचारमंथन कराना बहुतही जरूरी हो गया है। अन्यथा सोशल मिडीया यह आनेवाले समय मे एक आत्मघाती बम का काम करेगा जिसकी चपेट मे हरओ  भारतीय समाज आ सकता है। आज आप देख सकते हो की लोग अपने हित मे बात करके दुसरो की सरे आम धार्मीक भावना दुखाई जा रही है। जिससे देश मे एक दुसरे के खिलाफ जहरिला जहर  पनपता दिख रहा है। सोशल मीडिया पर किसी न्युज चैनल का व्हिडियो के निचे मे आप कॅमेन्ड बॉक्स पढके देखो कोई लोग गाली गलोच करता है। तो कोई इस पर बहस करने लग जाता है। जिससे साफ प्रतिक होता है।.की लोगो को एक दुसरे के विचारो से सहमत नही है।
                            देश की सरकार जो निर्णय लेती है उस पर ही रोज प्रतिक्रीया आती है। हाल ही मे कपिल शर्मा ने मोदी को ट्व्टिर पर अपनी तक्रार की जिस पर कई दिनो तक सोशल मिडीया पर बवाल मचा हुआ था। कपिल को सोशल मिडिया पर शिकायत करना मंहगा पडा है। साथ ही उन्होने अभी तक भष्ट्राचारी  ऑफीसर का नाम नही बताया है। वैसे ही भारत ने  पाकिस्तान सिमा पर जो हाल ही मे सर्जीकल स्टाईक किया है । उसर पर लोगो ने काफी अच्छी और काफी बुरि भी प्रतिक्रीया आयी है। यह तो सभी ने अपने आखे से देख ही लिया है। इस सोशल मीडिया मे देश के बढे-बढे  नामचीन हसतीयो ने भी भारत  भी  सर्जिकल स्टाईक पर काफी बेतुके सवाल जवाब किये जिसका खामीयाजा आज भूगत रहे है। आज समाज मे रहने वाले शिक्षित लोग भी सोशल मिडिया का दूर उपयोग करते नजर आ रहे है। क्यू की उन्हे पता हे की आज हर व्यक्ति अपनी विचार धारा थोपते हुवे दिखाई दे रहा है। जिससे भारतीय लोगो के धार्मिक भावना को भी इस बेतुके बयान से ठेच पोहच रही है। सोशल मिडिया का यह कहर आने वाले दिनो मे एक उग्र रुप धारण करते नजर आ रहा है। जिससे देश मे दंगे फसाद होने के आशंका बढने के आसार है।
                               दोस्तो आज जो शिक्षित लोगो हे वह सोशल मिडिया पर एॅक्टिव्ह हे पर उन्हेने ऐ नही समझता की अपना एक गलत कॅमेंड शेअर करने का परिणाम आने वाले दिनो मे क्या कर सकता है। इस का अंदाजा भी इन लोगों को नही है। दोस्तो देश की आधी जंनता को सोशल मिडिया क्या है ऐ भी नही समझता। उन्हके पासतो मोबाईल लेने के लिए पेैसा भी नही है तो सोशल मिडिया पर क्या क्रांती करेगे।आज देश मे ज्यादा बेरोजगारी बढगई हैं। देश के युवा भूका सो रहा है भारत की युवा इस सिस्टीम से तंग आ चुका है। हर पाच साल के बाद नयी सरकार आती है और अपनी योजनाऔं का मार्केटिंग सोशल मिडीया पर जमकर करती है। पाच साल जाने के बाद फिर एक बार कॉग्रेस नही तो बिजेपी सरकार आती है । याने मेरे कहने का सिधा मतलब हे कि यह दोनो पार्टी के बिना कोई पार्टी आगे नही आती। देश में इन्ह दो पार्टीयो की नंवटकी पिछले कुच्छ साल से चलती आ रही है। इस का तमाशा आप को सोशल मिडीया मे रोजाना देखन को मिलता है। जिस पर हम लोग सब से ज्यादा कॅमेन्ड करते है।
    आज सोशल मिडिया का सब से ज्यादा फायदा राजनेती पार्टीयो को   हो रहा है । जिससे देश की मुल समस्याओ से ध्यान विचलीत कर आप का ध्यान  दुसरे मुददो पर आर्षित कर रही है। इसी लिए देश के युवाओ ने इस पर विचार कर  अपा संतुल बनाये रखना चाहिए . साथ ही आज  भारत का किसानो को खेती करना नही चाहता जिसके लिए सोशल मिडिया के जरिए से उन्ह  किसानो का  होसला बढाना चाहिए। पर आज होसला बढाने की बात छोडदो उस पर बेतुके कॅमेन्ड मारते है देश का किसान कभी सुखे की मार से तो कभी ओले की मार से उसके खेती के माल का नूकसान होता है तो आज का युवा उन्ह मजबुर किसान की आवाज सोशल मीडिया तक नही पोहचाते। पर जब आरक्षण की बात आती हैै तो सोशल मिडिया पर हर तरिके हतकंडे अपनाते है  एक दुसरे आरक्षण खाने पे आज सब तूले बैठे हैे ना। पर सरकारने भी आरक्षण के नाम पर देश के लोगो को एक दुसरे  समाज से बाट दिया गया है और वही प्रथा आज भी शुरू है जिस का पालन सोशल मिडिया मे पोस्ट कर के उसका स्वरक्षण खूद ही कर रहे है जिस पर आज के यूवाऔ ने विचार मंथन करना चाहिए और सोशल मिडिया का सहि कामो के लिए उपयोग करना चाहिए अन्यथा आने वाले दिनो मे सोशल मिडिया भारत के लोगो  के लिए घातक साबित हो सकता है।  

नितीन  बिनेकर

Friday, September 16, 2016

राज्यातील लोकांना मिळणार:सायबर सुरक्षा

सायबर गुन्हंयाना राज्यातून हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत १५ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकाच दिवशी ४२  सायबर लॅबची सुरुवात केली. महाराष्ट्र गृह सुरक्षा विभागातील  हा एक ऐतिहासिक  निर्णय आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता सायबर सुरक्षा मिळणार आहे .
कधी कोणाचा ई-मेल हॅक होतो, तर कधी  कोणाच्या ऑर्कुट प्रोपाईल मध्ये गडबड होते तर. कोणाच्या प्रोफाइल मध्ये पॉर्न साईटच्या शिरकाव केला जातो . तर कधी ई-मेल गायब झालेला असतो, अशा घटना सर्वत्र वारंवार घडत असतात. आता सुशिक्षित सायबर दरोडेखोरांची संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. या सर्व सायबर गुन्हंयाना  प्रतिबंध घालण्यासाठी  राज्य शासनाने स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यात ४२ ठिकाणी एकाच दिवशी सायबर लॅबची स्थापना केली. त्यामुळे राज्यातील सायबर गुन्हेगारीवर वचक बसण्याबरोबर गुन्हंयाची उकल तात्काळ करणे व आरोपीचा तात्काळ शोध लागण्यास आता पोलीस विभागाला नक्कीच मदत होणार आहे .
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील जागतिक व्यापार संघटनेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी त्यांनी या सायबर लॅबची संपूर्ण यंत्रणा इतक्या कमी कालावधीत उभारण्यामागे योगदान देणारे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी  व गृह विभागाचे व विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह व इतर सायबर अधिकारी यांचे अभिनंदन केले. सायबर गुन्हंयापासून  देशातील व राज्यातील लोकांना कशा प्रकारे सुरक्षा देता येईल आणि सामाजिक सुव्यवस्थेला बाधा येणार नाही. या बाबत मुख्यमंत्र्यानी संपूर्ण पोलीस सायबर अधिकारी आणि कर्मचारी यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले .
        
सायबर गुन्हयांचे क्षेत्र फार मोठे आहे. एका बाजुला वैयक्तिक व संस्थेच्या माहितीच्या गुप्ततेचे उल्लंघन करून या मध्ये इंटरनेटवर त्या संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या गुप्त माहितीचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जातो. तर दुसऱ्या बाजुला व्यक्तीची ओळख चोरली जाते. आर्थिक बाबतीत गुन्हेगारी, चाईल्ड प्रोनोग्राफी, डिजिटल पायरसी, पैशांची अफरातफर, फसवणूक अशा अनेक बाबीचा यात समावेश आहें. एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करून केलेले विशिष्ट पद्धतीचे गुन्हे आणि यामध्ये गुन्हेगार आपली ओळख लपवून ठेवू शकतो. तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षपणे इंटरनेटवरून नुकसानही केले जाते. यामध्ये स्पॅम, हँकिंग किंवा सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारा सायबर दहशतवाद पसरविताना आज जगाला दिसत आहे.
या सायबर गुन्हेगारीवर वेळेत नियंत्रण आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाने गृह विभागामार्फत महाराष्ट्र सायबर प्रकल्प राबविण्यांचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातंर्गत  जिल्हास्तरावर सायबर लॅब महाराष्ट्र CERT, Security Operation Centre व ट्रेनींग सेंटर स्थापन करण्यात येत आहे. क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम     ( CCTNS ) प्रणाली राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.  त्याचबरोबर राज्यातील मुंबई, पुणे यासारखी प्रमुख्य शहरे CCTV च्या निगराणी खाली आणण्यात आली आहे . आता थेट सायबर लॅबची स्थापना करून महाराष्ट्रातील लोकांना सायबर गुन्हेगारा पासून सुरक्षा देण्यात येणार आहे .
यापूर्वीच सायबर क्राईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा सायबर विंग कार्यान्वित आहे. मात्र सायबर क्राईम रोखण्यास पोलिसांना अपेक्षित यश येत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात पोलीस घटकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानचे सुसज्ज अशा सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आणि स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वा वर राज्य भरता सायबर लॅब  कार्यान्वित झाल्या. या लॅब मध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलीस सायबर क्राईम करणाऱ्याना रोखू शकणार आहे. या सायबर लॅबमुळे संशयीत सायबर गुन्हे करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवून त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या हालचालीचे चित्र  पोलीस सरळ टिपू शकतील .
या आधुनिक सायबर लॅब मध्ये नवनवीन सॉफ़्टवेअर वापरले जाणार आहे .यात ऍनालिसीस सॉफ़्टवेअर व सीडीआर ऍनालिसीस सॉफ़्टवेअरमुळे पोलिसांना संशय असलेल्या सायबर गुन्हेगारावर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे तो गुन्हेगार नेमका कशापधदतीने सायबर गुन्हे करण्याचा प्रयत्न करत आहे ही बाब पोलिसांना लॅब मधूनच पाहता  येणार आहे . एखाद्या गुन्हयात आरोपींनी केलेल्या मोबाईल कॉलचे पोलिसांकडून कॉल डिटेल्स मागविण्यात येतात. यापूर्वी या कॉल डिटेल्स आल्यानंतर पोलिसांना मन्युअल पद्धतीने त्यावर काम करावे लागत असल्याने जास्त वेळ खर्ची व्हायचा मात्र आता या आधुनिक सायबर लॅब मुळे पोलिसांचे कमी वेळात  काम सोपे झाले आहे . 
सध्या आधुनिक युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डाटा ट्रान्सफ़र केला जातो. राज्यात तसेच ई-बँकिंग पेपरलेस, सोशल मीडिया यांचा वाढता उपयोग आणि त्यामार्फत होणारे सायबर गुन्हंयांतही  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकदा सोशल मीडिया वर नको असलेल्या पोस्ट किंवा क्रिएशन केलेले छायाचित्र किंवा  चित्रफीत व्हायरल केल्या जातात मात्र हे नेमके कोणी केले. हा शोध घेण्यासाठी यापूर्वी पोलिसांना जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागायची .पण आता मात्र तो शोध पोलिस तातडीने घेऊ शकणार आहे.
या अत्याधुनिक सायबर लॅबसाठी १ हजार पोलिसाना विशेष प्रशिक्षण देऊन राज्यात सायबर फोर्स उभारणार असल्याची माहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शी कारभार करीत असताना जनतेची सुरक्षितता व त्यांच्या मालमतेचे रक्षण करण्यासाटी राज्यात सायबर फोर्स उपयुक्त ठरणार आहे .
देशातील डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरु असताना राज्यात स्मार्ट सिटी व स्मार्ट गावे तयार होत आहे. त्याचबरोबर राज्यातील ५०० ग्रामंपचायती संपूर्ण डिजिटल करण्यात येत आहे. इंटरनेटच्या अधिकाधीक वापरामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण व पध्द्तीमध्ये वाढ झाली आहे. या  गुन्हयांवर  नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प राबवुन त्याला सायबर लॅबची जोड दिल्याने सायबर गुन्हेगारीवर आता पोलीस विभागाचा वचक राहणार आहे . त्याचप्रमाणे राज्यातील सर्व पोलीस ठाणे क्राईम क्रिमिनल ट्रॅकिग नेटवर्क सिस्टीम या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात आली आहे.  तसेच पुणे येथे ऑनलाईन तक्रारी नोंदविण्याची प्रकिया सुद्धा सुरु करण्यात आली आहे. राज्यातील गुन्ह्यांचा शोध तातडीने लावण्यासाठी अत्याधुनिक फाँरेन्सिक लॅबची क्षमता वाढविण्यात आली आहे. सायबर सेवा लोकांच्या सुरक्षितेबरोबरच खाजगी बँका व इतर संस्थानाही देण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यात सर्वाना सायबर सुरक्षेचा  लाभ घेता येईल.
गृह विभागाने राज्यात एकाच वेळी सुरु केलेल्या या सायबर लॅबच्या प्रकल्पाला व त्यांच्या भावी वाटचालीला मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा .

नितीन शं बिनेकर
मो. ९९७०४२०७३६