मुंबईच्या
विकासाची वाट स्वकियांना दाखविण्यासाठी मुंबईच्या रेल्वेपासून अनेक
उपक्रमात आघाडीवर असणारे… स्थानिकांची विकासाची बाजू समजून घेऊन त्यांचे
प्रतिनिधित्व कारणारे नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांची १५१ वी पुण्यतिथी ३१
जुलै रोजी आहे. यानिमित्त त्यांच्या महान सेवाभावी कार्याचा हा परिचय.
मुंबईचे आद्य शिल्पकार व एक थोर समाजसेवक तसेच शिक्षणप्रेमी म्हणजे नाना शंकरशेठ. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. ते देवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबातील होते. सचोटीने व्यापार करून मोठा धनसंचय करावा व त्याचा उपयोग परोपकारासाठी करावा, हे या कुटुंबांचे अनेक पिढ्यांचे जणूकाही तत्वच होते. त्यामुळे सर्वत्र त्यांना प्रतिष्ठाच होती.
नानांचे वडील व्यापारासाठी मुंबईत आले. त्यांची आई भवानीबाई या त्यांना लहानपणीच सोडून गेल्या. त्यांचे मातृछत्र लहानपणी हरपल्यावर शंकरशेठजींनीच नानांचे उत्तम शिक्षण व्हावे, यासाठी विद्वानांकडून तत्कालिन भारतीय पारंपरिक शिक्षण व नावाजलेल्या इंग्रजी शिक्षणाची सोय घरीच केली. नानांची बुद्धी अत्यंत कुशाग्र होती. त्यांचे भाषांवरचे प्रभुत्व दांडगे होते. ते संस्कृतमध्ये आणि इंग्रजीत उत्तम लिखाण करीत असत. नानांचे वडील १८२२ मध्ये म्हणजे त्यांच्या १९ व्या वर्षीच वारले व नानांवर तरुणपणीच सर्व जबाबदारी पडली. जी त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली.
मुंबईचे आद्य शिल्पकार व एक थोर समाजसेवक तसेच शिक्षणप्रेमी म्हणजे नाना शंकरशेठ. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. ते देवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबातील होते. सचोटीने व्यापार करून मोठा धनसंचय करावा व त्याचा उपयोग परोपकारासाठी करावा, हे या कुटुंबांचे अनेक पिढ्यांचे जणूकाही तत्वच होते. त्यामुळे सर्वत्र त्यांना प्रतिष्ठाच होती.
नानांचे वडील व्यापारासाठी मुंबईत आले. त्यांची आई भवानीबाई या त्यांना लहानपणीच सोडून गेल्या. त्यांचे मातृछत्र लहानपणी हरपल्यावर शंकरशेठजींनीच नानांचे उत्तम शिक्षण व्हावे, यासाठी विद्वानांकडून तत्कालिन भारतीय पारंपरिक शिक्षण व नावाजलेल्या इंग्रजी शिक्षणाची सोय घरीच केली. नानांची बुद्धी अत्यंत कुशाग्र होती. त्यांचे भाषांवरचे प्रभुत्व दांडगे होते. ते संस्कृतमध्ये आणि इंग्रजीत उत्तम लिखाण करीत असत. नानांचे वडील १८२२ मध्ये म्हणजे त्यांच्या १९ व्या वर्षीच वारले व नानांवर तरुणपणीच सर्व जबाबदारी पडली. जी त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली.
सार्वजनिक कार्याचा प्रारंभ
१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन संपूर्ण मुंबई परिसराचे गव्हर्नर झाले. दरबार व मेजवाण्यांच्या निमित्ताने त्यांची व नानांची गाठ पडली. एल्फिन्स्टनने मुंबई परिसरात आधुनिक शिक्षणाचे पर्व सुरु करण्याचा ठाम निर्धारच केला होता. नानांची बुद्धिमत्ता व प्रगल्भता यामुळे एल्फिन्स्टनने यांच्या प्रयत्नामध्ये नानांना महत्वाचे स्थान दिले होते. त्यांच्या या प्रयत्नानंतर १८२२ मध्ये मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तके मंडळाची स्थापना झाली आणि त्यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली.
शिक्षण क्षेत्राला दिली चालना
हैंदशाळा आणि शाळापुस्तके मंडळाचे १८२४ रोजी बॅाम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटीत रूपांतर झाले. पुढे त्यांनी सदाशिव छत्रे व जगन्नाथ शास्त्री यांच्या सहकार्याने मुंबईत ठिकठिकाणी शाळा उघडल्या. नानांकडून हुशार मुलांना परिक्षेनंतर शेला, पाणोटी, रेशमी व जरीचे कपडे बक्षीस स्वरूपात दिले जात. त्यामुळे मुलांची संख्या वाढण्यात व शिक्षणाचे कार्य वाढविण्यात मदत झाली. पुढे १८३४ साली मिशनरी डॉ. विल्सन यांच्या मार्गदर्शनावरून नानांनी आपल्या बंगल्याच्या आवारात मुलींच्या शाळेला जागा दिली. इतकंच नव्हे तर आपल्या घरातील मुलींनाही शाळेत पाठविले.
मातृभाषेचा पुरस्कार
नाना शंकरशेठ व एल्फिन्स्टन यांनी मातृभाषेत शिक्षण दिले जावे त्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये देवनागरी भाषांची प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तके छापली गेली. त्यामुळे संपूर्ण लोकांसाठी आधुनिक शिक्षणाची दारे खुली झाली. १८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज व शिक्षण संस्था कार्य करू लागल्या. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पुढे थोर महापुरुष निघाले. ज्यात दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या अनेकांचा समावेश आहे. त्यांनी पुढे देशात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले.
आधुनिक शिक्षणाला प्रोसाहन
नाना शंकरशेठ यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेक विविध लोककल्याणकारी सुधारणांचा जणूकाही मुंबईत पायाच घातला. त्यांनी १८४५ मध्ये जे. जे. रुग्णालय व ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना, १८४९ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय व संस्थाद्वारे एतदेशीयांच्या कल्याणशाळा, १८५१ मध्ये सर्वांना संस्कृतचे शिक्षण खुले करणारे पूना संस्कृत कॉलेज म्हणजे आजचे डेक्कन कॉलेज, १८५५ मध्ये पहिले विधी महाविद्यालय, १८५७ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व बॉम्बे युनिवर्सिटीची स्थापना असा नानांचा कर्तुत्वाचा आलेख पुढे चढत गेला. भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया नाना शंकरशेठ यांनीच रचल्याचे दिसून येते.
स्वातंत्र्य अस्मितेचा आरंभ
नव्या युगाला आरंभ करणारे आधुनिक काळात जे थोर महापुरुष झाले. त्यात नाना शंकरशेठ अव्वल दर्जाचे होते. जेव्हा देशात इंग्रजांची सत्ता होती तेव्हा भारतीय लोकांना इंग्रजांच्या दबावाखाली जगावे लागत होते. देशाच्या विकासासाठी आणि इंग्रजांनाकडून झालेल्या पराभवाची झळ हाच स्वातंत्र्य अस्मितेचा प्रारंभच होता. इंग्रजांच्या अंमलाखालील भारतासाठी काय आवश्यक आहे, याची जाणीव असल्यामुळे त्यांनी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षणांच्या क्षेत्रात विकासाची बिजे रोवली होती. त्याचा पुढे स्वातंत्र्याच्यावेळी फायदा झाल्याचे दिसून येते.
मुंबईला प्रकाशात आणणारे नाना
सात बेटाच्या वर बसलेल्या मुंबई शहराच्या विस्तार व विकासामध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मुंबईतील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्याचप्रमाणे बॉम्बे स्टीम नॉव्हिगेशन कंपनीची स्थापना, नाटकाचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण व मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी गॅसबत्तीची सुरुवात त्यांच्या प्रयत्नाने झाली. त्यामुळे मुंबईला प्रकाशमान करण्याचा मानही त्यांनीच पटकावला.
क्रूर प्रथेच्या उच्चाटनात नानांचा पुढाकार
पूर्वी आपल्या देशात वाईट चालीरीती होत्या. ज्यामुळे निर्दोषांना त्याची झळ सोसावी लागत असे. त्यातील एक प्रथा म्हणजे सती जाण्याची प्रथा होय. १८२८ मध्ये कोलकातामधील लॅार्ड बेंटिग गव्हर्नर जनरल झाला. त्यावेळी बंगालमध्ये राजाराम मोहन रॉयने सतीच्या अमानुष प्रथेच्या उच्चाटनाबाबत सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी प्रयत्न केला होता. तेव्हा राजाराम मोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांनी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज करून या प्रथेचे उच्चाटन करण्याची विनंती करून आपली मते ठामपणे मांडली होती.
दानशूर व्यक्ती
नाना शंकरशेठ यांनी व्यापारी कुटुंबात जन्म घेतल्याने ते व्यापार करून धनसंचय करायचे आणि ते पैसे देणगी स्वरूपात जनकल्याणासाठी देत होते. म्हणूनच त्यांना मुंबईतील दानशूर या नावाने ओळखले जात. त्यांच्या या देणग्यामुळे शहरातील मोठ्या शिक्षण संस्था आज चालताना दिसत आहेत. त्यांनी अनेक संस्थाना देणग्या दिल्या. त्यापैकी रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई, व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तूसंग्रहालय, मुंबई विद्यापीठ अशा संस्थाना देणग्याच्या स्वरुपात मदत केली.
नानाच्या गौरवार्थ जिजामाता बागेत उभारला पुतळा
नाना शंकरशेठ यांचा महान सेवाभावी कार्याने भारावून जाऊन लोकांनी त्याचा पुतळा उभारणीसाठी स्वच्छेने २५ हजार रुपये गोळा केले होते आणि त्यांच्या गौरवार्थ जिजामाता बागेत पुतळा उभारण्यात आला होता. नानांचे कार्य आणि दानशूरपणा पाहून इंग्रजांनीही त्यांचा मानसन्मान केला होता. त्यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी ते थोडंच आहे. कारण त्यांनी निस्वार्थीपणे सढळ हस्ते आपली संपत्ती दान केली. म्हणूनच मुंबईचे शिल्पकार म्हणून नानांचे नाव आजही घेतले जाते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विन्रम आदरांजली.
-नितीन शं. बिनेकर,








