भारतीय जनतेमध्ये स्वराज्याची, राष्ट्रवादाची जाणिव निर्माण करणारे तसेच स्वराज्य मिळविण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे, महाराष्ट्रातील राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १ ऑगस्ट रोजी ९६ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांनी मुंबईतील सरदारगृहामधून चालविलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा व त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा हा परिचय...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे
झाला. दापोलीजवळ चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होते. टिळकांचे संपूर्ण शिक्षण
पुण्यातच झाले. १८७२ मध्ये त्यांचा विवाह सत्यभामाबाई सोबत झाला. १८७७
मध्ये टिळक यांनी डेक्कन कॉलेज मधून बी.ए व १८७९ मध्ये एल.एल.बी. शिक्षण
पूर्ण केले . राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेतून विष्णुशास्त्री चिपळूणकर
यांच्याबरोबर टिळक, आगरकर, आपटे आणि नामजोशी यांनी १ जानेवारी १८८० रोजी
न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी
आणि १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
केसरी व मराठा वृत्तपत्राची सुरुवात
सर्वसामान्य लोकांपर्यत आपले विचार पोहचावेत आणि लोकांवर इग्रंजांकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडता यावी म्हणून २ जानेवारी १८८१ रोजी इंग्रजी भाषेत मराठा आणि मराठी भाषेत केसरी वृत्तपत्रे सुरु केले. पुढे १८८२ मध्ये टिळक व आगरकर या संपादकांना १०१ दिवसांचा डोंगरी येथे कारावास झाला. याचं कारण म्हणजे केसरीच्या सिंहगर्जनेने इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते. लोकमान्य टिळकांनी दोन्ही वृत्तपत्रांच्या उपयोग लोकजागृतीसाठी केला. केसरी व मराठा ही स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांची ही शस्त्रेच होती.
शिवजयंती व गणेशोत्सवाचा आरंभ
निद्रिस्त सामाजाला जागे करून. त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा दृष्टीने आणि सर्व जातीपातींच्या लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव आणि रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची डागडुजी करून १८९६ मध्ये शिवजयंती हे दोन राष्ट्रीय उत्सव सुरु केले. या उत्सवातून भाषणे आणि किर्तनाद्वारे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रजागृतीचा संदेश दिला आणि इंग्रजाविरुद्ध जनशक्ती उभी केली. भारतातील जनतेत स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेशी यांचा अभिमान निर्माण व्हावा ही या मागील प्रेरणा होती.
मुंबईतील टिळकांचे वास्तव्य
टिळकांचे पूर्वी पासून मुंबईशी खूप घनिष्ट संबंध होते. जेव्हा मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सवाची धामधूम १८९५ च्या सुमारास वाढली व लोकमान्य मुंबईत येऊ लागले. तेव्हापासून पुढे १० ते १२ वर्षे ते त्यांच्या परमस्नेही दाजी आबाजी खरे यांच्याकडे मुक्काम करीत. दाजीसाहेब हे वकील होते व गिरगावातील आंगरेवाडीत राहत. टिळक आणि दाजीसाहेब हे दोघेही बालमित्र होते. दाजीसाहेब यांचा वकिलीचा व्यवसाय जोमाने चालावा म्हणूनच पुण्याहून मुंबईत आले होते. दाजीसाहेब हे नेमस्त व सुधारक वृत्तीचे होते. टिळकांवर आलेल्या प्रत्येक संकटात दाजीसाहेब सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहत.
सरदारगृहाचा इतिहास

सरदारगृह : टिळकांचे दुसरे घर
लोकमान्य टिळक सरदारगृहाला आपले दुसरे घर असे म्हणत. राष्ट्रीय पक्षाचे अनेक पुढारी मुंबईतल्या सादगृहात टिळकांना भेटायला येत होते. पुढे बघता बघता सरदारगृह स्वातंत्र चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनून गेले. या ठिकाणी टिळक आणि त्यांचे सहकारी मित्र स्वातंत्र्य चळवळीची योजना आखत असत. या सरदारगृहात टिळकांना भेटणाऱ्यांमध्ये मौलाना शौकत अली, ॲनी बेझंट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशा अनेकांची गणना होते. त्याचबरोबर महात्मा गांधी व टिळक यांच्या दोन भेटी येथे झाल्या.
मुंबईत टिळकांच्या शिक्षेला विरोध
१८९८ ते १९०८ या दहा वर्षात लोकमान्य टिळकांनी अखिल भारतीय स्वातंत्रलढ्याची सूत्रे हाती घेतली. जहालचे नेते म्हणूनच काँग्रेस पक्षाला दिशा देताना स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही राष्ट्रीय चळवळीत चतु:सूत्री त्यांनी सांगितली. लोकमान्य टिळकांवर दुसऱ्यांदा राष्ट्रद्रोहाचा खटला झाला
भरला. त्यात त्यांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यावेळी मुंबईतील हजारो गिरणी कामगारांनी प्रथमच मुंबई बंद पुकारला. टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात स्वराज्याची चळवळ थंडावली होती. पुढे लोकमान्य टिळक शिक्षा पूर्ण करून बाहेर पडले तेव्हा त्यांनी होमरूल लीग हिंद स्वराज्य संघाची स्थापना करून लोकमान्यांनी भारतभर दौरे काढले आणि मरगळलेल्या चळवळीला तेज आणले. १९१६ मध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, व मी तो मिळविनारच’ हा महामंत्र त्यांनी उच्चारला स्वराज्यासाठी एक संघ फळी निर्माण केली.
सरदारगृहात टिळकांनी घेतला अखेरचा निरोप
लोकमान्य टिळकांची देशासाठी अविश्रांत धडपड, उतरत्या वयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणे पूर्ण विश्रांती घेत नसत. जुलै १९२० मध्ये त्यांना हिवतापाने घेरले. आता त्यांना अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईतील सरदारगृहातच होते. १ ऑगस्ट १९२० चा दिवस उजाडला टिळकांनी आपले प्राण सोडले आणि भारताचा तेजस्वी सूर्य मावळला. ही बातमी सर्व मुंबईत व देशभर वाऱ्यासारखी पसरली मुंबईतील लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते. हळूहळू देशभरातील व मुंबईतील टिळकप्रेमी सरदारगृहाच्या बाहेर टिळकांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जमा झाले. टिळकांचा अंत्यविधी चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटात करण्याचे ठरविल्यामुळे मुंबईतील लोकांना बरे वाटले. मुंबईच्या इतिहासातील चौपाटीच्या वाळवंटात तो पहिला अग्निसंस्कार होता. सरदारगृहापासून लोकमान्य टिळक यांची पार्थिवयात्रा निघून चौपाटीवर आली. तेव्हा चौपाटीवर लोकांची प्रचंड गर्दी होती. यावेळी अंत्यसंस्काराला अनेक देशातील पुढारी उपस्थित होते. सर्वानी त्यांना श्रद्धांजंली वाहिली.
टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करून देशसेवा केली. शरीर थकलेले असतानाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने, कार्यक्रम सुरुच होते. लोकमान्य टिळक आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिले. अशा या महान नेत्यास विनम्र आदरांजली.
- नितीन बिनेकर
मो. ९९७०४२०७३६

No comments:
Post a Comment