Saturday, October 21, 2017

पत्रकारिताची वाट दाखवणारी ताई

मला पत्रकारिताची वाट दाखवणारी..प्रत्येक गोष्टीत समजून सांगणारी......नागपूर मध्ये पत्रकारिताच्या अभ्यासात सहकार्य करणारी...ती म्हणजे माझी कविता ताई..दिवाळीच्या दोन दिवसापूर्वी तिची माझी भेट मंत्रालय परिसर मध्ये झाली... नोकरीचा कामा निमित्य ते मुंबईत आली होती... आमच्या या भेटीमुळे जाळूक लागलेल्या आमच्या कॉलेजच्या आठविनी पुन्हा एकदा ताजा झाल्या. आमच्यां जुन्या आठवणी दोघांच्या मनाला पुन्हा हसवून गेलं तिचा हसारा चेहऱ्यावर खूप दिवसांनी बघून माझा मनाला खूप बर वाटलं... 
             या भेटीत 4 वर्षी पूर्वीची कविताताई आजची  कविता ताई मध्ये खूप अंतर मला जाणवतं होत.....कविता मध्ये पूर्वी पेक्षा खूप बदल झालेल्या होत... तिच्या विचारात खूप सकारात्मकता होती. लढण्याची खूप जिद्द तिच्या डोळ्यात दिसत होती...आणि मला स्वतःच्या पायावर उभ राहायचं आहे... असे कडक उदगार तिच्या मुखातून निघत होते...वयाची ३३ गाठणारी हि माझी कविता ताई तिच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. चार बहिणीमध्ये ती सर्वात लहान आहे. वडिलांच्या पेंशन वर संपूर्ण कुठूबाच्या गाडा हाकलणारी ती माझी कविता ताई.... कवितांच्या तिन्ही बहिणीचं लग्न झालं... आपल्या आपल्या संसारात ते मग्न झाले होते .... आणि आमची कविता.... एका साप्ताहिकात मध्ये मोडक्या तोड्याक्या २ ते ३ हजार रुपयात पगारात काम करत आहे.. ती एक स्वता पत्रकार आहे. सोबतच पत्रकारिता क्षेत्रातील व्हिडीओ एडिटिंग पासून ते फोटो शॉप पर्यंतचे संपूर्ण कॊशल्य तिच्या अंगात असून सुद्धा आता पर्यंत तिला योग्य ती संधी कधी ही मिळालीच नाही... आणि जे मिळाली तर फक्त ते तुटपुंजी पगाराची नोकरी.... मी एकेकाळी नागपूर विद्यापीठामध्ये जर्नलिझम पदवी करत होतो. तेव्हा माझा एक वर्ष कविता ताई सिनियर होती. पण कधी हि तीळ भर सुद्धा गर्व न करता माझा सारख्या बँक बैचेस मुलांना सरळ हातानी मदत करायची. तिच्या स्वभाव एकदम मनमोकळा हसमुख होता. कविता ताई माझा सदैव आत्मविश्वास वाढवाची. कारण त्यावेळी मी ग्रामीण भागातून थेट नागपुर युनिव्हर्सिटी कैम्पसमध्ये उडी घेतली होती. पण त्यावेळी माझंत खूप सारे न्यूनगंड होते. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात माझी बूझाळल्या प्राण्यासारखी अवस्था झाली होती. माझा या अवस्थेतून बहार निघण्याकरिता मला तीच नेहमीचं सहकार्य लाभलं...तिने पत्रकारिता अभ्यास क्रमाच्या स्वतःच्या काढलेल्या नोटस मला दिल्या.  आज पण मी सदैव ती नोटस जपून वाचत असतो. त्याकरितां तुझ मनापासून खूप धन्यवाद ताई..... या भेटीत ते मला तिच्या पत्रकारिताच्या क्षेत्रातला खूप वाईट अनुभव सांगत होती. कविता आजच्या पत्रकारिताचीच्या खडतळ प्रवासातून पुढे जात असताना तिची जिद्द बघून मला तोंडभरून तीच कोतूक करावंसं वाटत होतं....  आज माझा अवतिभोती आवरणाऱ्या पुरुष पत्रकारांची घरची परिस्थिती काय त्यांच्या समस्यांना काय यांचे चटके मला मागील तीन वर्षांपासून नागपूर आणि मुंबई मध्ये बसत होते. कारण मी पण स्वता नागपूर मध्ये पत्रकारिताच्या क्षेत्रात कार्यरत होतो...आज पत्रकारितेल्या भारतीय समाजाच्या चोथा स्तंभ मानल्या जाते. लोकांना न्याय देणारे, दिन-दुबळ्या घटकांच्या समस्यां उचलून धरणारे..आमचे निर्भीड व हाडा मांसाचे पत्रकार आज आपल्या समस्यांवर गप्प व शांतचं बसत असतात.....कारण आवाज उठवला तर....त्याची पोटाची भाखर निसटून जाईल...यांची भीती त्यांच्या सदैव मनात असते....मित्रांनों आज मोजक्या उच्चवर्णीय लोकांच्या अधिपत्याखाली आजच्या नवतरुण पत्रकार चेंदल्या जात आहे.... आजच्या पत्रकाराच्या  शब्दना बाजार तीळभर सुद्धा किंमत राहिलेली नाही. त्याचे शब्द मोडक्या तोडक्या रुपयात विकले जातं आहे....याविषयी इथे बोल बर नाही....पण आमची कविता ताईला पण या परिस्थितीची झडं बसली असावी असं मला तिच्या बोलण्यावरून मला प्रखर पणे जाणवतं होतं.....
           कविता एक मुलगी असून वयाच्या ३३ वर्षी जिद्दी ने आपल्या हितभर पोटासाठी आणि आपल्या माताऱ्या आई वडिलांच्या जाण्यापूर्वी स्वताला सिद्ध करून दाखविण्यासाठी तिची धडपड सुरु आहे...... ती पत्रकारिता क्षेत्रात योग्य ती संधी शोधत आहे.त्याचं बरोबर इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास सुरू आहे....तिच्या बरोबर बोलत असताना तिच्या वेदना आज मी शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही ... ती बिनधास्त बोलत होती आणि आपली संपूर्ण परिस्थिती फटाफट मला सांगत होती..... पण मी गप्पचं बसून होतो..... फक्त तिला मी धीर देत होतो.....  एकेकाळी  माझा नागपूर मधल्या महाविद्यालयीन जीवनात पासून पार्ट टाईम जॉब पर्यंतच्या प्रवासात हिचं ताई मला धीर देत माझा आत्मविश्वास वाढवत असायची .... पण आज मला  तिच्या आत्मविश्वास वाढवण्याची वेळ आली होती.....ती आज गंभीर दिसत होती....  मी थोड का होईंना तिच्या आत्मविश्वास वाढवत होतो .... कविता ताई सारख्या आज खूप मुली आपल्या परिस्थिती लढतांना मुंबईत पाहत होतों.... आजच्या बेरोजगारीच्या राक्षसासमोर शिक्षित तरुण मागें पडताना दिसतं आहे. प्रत्येक क्षेत्रा स्त्रिया-पुरुष समानतेची दरी कमी झाली. हे मान्य पण होय आप जेवढं शिक्षित झालों तेवढं कमकुवत सुद्धा झालों. कारणा शिक्षणा बरोबर आपल्या संधी मिळत नाही. प्रत्येक वेळी आपल्या कॊशल्याच भामट्या जगातील  ठेकेदार कवळी मोलाची बोली लावंतांनी बघत आहे. पण कविता न हार मानता आपल्या कॊशल्याचा जोराव लढण्याची जिद्द तिच्या नजरेत मला दिसतं होती. तिची हि जिद्द तिला एक दिवस खूप पुढे नेणार आणि भविष्यात तिची हि जिद्द खूप सारख्या मुलीला नवीन चैत्यन आणि बळ देणार ठरणार आहे.... कविता ताई तुझा या जिद्दीला माझा सलाम तुझा पत्रकारिताच्या पुढील वाटचालीला माझा कडून शुभेच्छा...आम्ही तुझा पाठीशी खंबीर पणे उभे आहोत...असा मी  विश्वास देऊन आम्ही निघून गेलो.....
नितीन बिनेकर

No comments:

Post a Comment